स्मार्टफोन आणि कॉम्प्युटर मध्ये सी क्लीनर अॅप अथवा सॉफ्टवेअरचा वापर करत असाल तर सावध रहा !
सी क्लीनर अॅप अथवा सॉफ्टवेअरचा उपयोग अनेक लोक मोबाईल किंवा कॉम्प्युटरमधील कॅशे, जंक फाईल्स, व्हायरस डिलीट करण्यासाठी करतात . परंतु सावधान कारण हॅकर्स सी क्लीनर सॉफ्टवेअरची सिक्युरिटी सिस्टीम मोडून त्यात मलवेअर इंजेक्ट करून मोबाईल किंवा पीसीमधून डेटा चोरत आहे .एका बातमीनुसार आत्तापर्यंतसुमारे २० लाख लोकांना याचा धोका पोहचला आहे.
सी क्लीनर व्हर्जन ५.३३.६१६२ मध्ये मल्टी स्टेज्ड मलवेअर पेलोड असल्यामुळे ते इन्स्टॉल करताच सिस्टममध्ये प्रवेश करतात.
हॅकरसाठी सॉफ्ट लक्ष्य सी क्लिनर आहे
हे सॉफ्टवेअर / अॅप्लीकेशन जगभरात वापरले जाते. हा अॅप भारतातील Android वापरकर्त्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. म्हणून हॅकर्सांनी हे माध्यम आपल्या हॅकिंगसाठी निवडले आहे.
A vast कंपनी
सी क्लीनरची सिक्युरिटी सिस्टीम आणि अँटी व्हायरस सॉफ्टवेअर हि A vast कंपनीची उत्पादने आहे.
आपल्या नेटवर्क, पासवर्ड आणि ब्राउझरच्या सुरक्षिततेसाठी अवास्ट फ्री एंटीव्हायरस उपलब्ध आहेत
जे इन्स्टॉल करण्यास आणि वापरण्यास सोपे आहेत .
काय करतात हॅकर्स ?
हॅकर्स आपल्या सिस्टीमचा आयपी अॅड्रेस, नेटवर्क, क्रेडीट कार्डची आणि पासवर्ड माहिती चोरतात.
या लोकांना त्रास नाही
'एवेस्ट'(A vast ) कंपनीच्या मते, या मालवेअरने 20 लाखापेक्षा जास्त संगणक वापरकर्ते प्रभावित झाले आहेत.. त्यापैकी बहुतेक संगणक हे 32-बिट विंडोजचे आहेत. असा अहवाल उपलब्ध आहे
सिस्टीममध्ये सी क्लिनरचे ५.३३.६१६२ व्हर्जन असल्यास ही समस्या उद्भवू शकते. सी क्लिनर १२ डिसेंबरनंतर अपडेट केले असलेले युसर्स पूर्णपणे सुरक्षित आहात. महत्वाचे म्हणजे सी क्लीनरचे हे व्हर्जन फक्त कॉम्प्युटरसाठी उपलब्ध असल्याने अॅनरॉईड स्मार्टफोन युजर्सना कोणताही धोका नाही.
लेखक : प्रा योगेश हांडगे
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )
(handgeyogesh@gmail.com)
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )
(handgeyogesh@gmail.com)
No comments:
Post a Comment