Tuesday, 3 October 2017

महिलांच्या सुरक्षेकरिता उपयोगी मोबाइल अ‍ॅप

महिलांच्या सुरक्षेकरिता उपयोगी मोबाइल अ‍ॅप
१)महिलांची छेडछाड रोखण्यासाठी जळगाव पोलिस हेल्पलाइन मोबाइल अॅप

 महिलांच्या छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी तसेच सायबर गुन्हेगारीला अाळा घालण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिस दलातर्फे नवे मोबाइल अँड्राॅइड अॅप तयार केले आहेत. 
सायबर गुन्ह्यांवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाने  सायबर सेल आणि खाजगी सॉफ्टवेअर उद्योग  समूहाच्या सहकार्याने  मदतीने नवीन सोशल मीडिया सेंटर तयार करण्यात आले आहे.महिला अत्याचाराच्या घटना आणि ज्येष्ठ नागरिकांना या अॅपची मदत हाेणार अाहे.

महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांना उपयोगी अॅप
या अॅपचा उपयोग महिलांना, तरुणी यांना छेडखानी राेखण्यासाठी तसेच एकटे राहत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना देखील होणार आहे. मोबाइल अॅपवर बोट ठेवताच ते कार्यान्वित होईल आणि  त्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षात सेकंदाला पोहचेल . त्यामुळे पीडितांना तत्काळ मदत पोहोचवली जाईल . अँड्रॉइड मोबाइलमधील जीपीएस प्रणाली सुरू असल्यास  आणि या अॅपमध्ये देण्यात आलेल्या निर्भया या पर्यायाची निवड केल्यास आपण असलेल्या ठिकाणाची पोलिसांना माहिती मिळेल  या अॅपमध्ये सर्व पोलिस ठाण्यांचे क्रमांकासह विविध पर्याय दिलेले आहेत .
असे असेल  अॅप 
अँड्राॅइड फोनमध्ये गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन जळगाव पोलिस हेल्पलाइन हे अँड्रॉइड अॅप्लिकेशन डाऊनलोड करून घ्यावे आणि  त्यात आपले नाव नंबर, पत्ता, उपयोगी माहितीसह कुटुंबातील जबाबदार व्यक्तींचे संपर्क नंबर आदी माहिती अपलोड करून घ्यावी लागेल. त्यासाठी जीपीएस प्रणाली सुरू असणे अावश्यक अाहे. पोलिस मदतीची आवश्यकता असल्यावर मोबाइलमध्ये या अॅपवर बोट ठेवताच नियंत्रण कक्षास त्यांचे लाेकेशन प्राप्त हाेऊन तत्काळ पाेलिसांची मदत हाेईल.

२) महिला प्रवाशांच्या सुरक्षेकरिता रेल्वेचे अ‍ॅप::रेल्वे सुरक्षा बल’चे  (RPF चे) ‘आयवॉच विमेन’ हे नवीन अॅप 
महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विशेष लक्ष देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यासाठी एम-इंडिकेटरवरच रेल्वे पोलिसांचा (आरपीएफ) हेल्पलाइन नंबर देण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. 
एम-इंडिकेटरवर पश्चिम आणि मध्य रेल्वेचा हेल्पलाइन नंबर देण्यात आला असून यात आपत्कालीन परिस्थितीसाठी एसएमएस सेवाही उपलब्ध करण्यात आली आहे. एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नातेवाइकांनाही एसएमएस जावा आणि त्यांनाही संपर्क साधता येण्यासाठी यामध्ये दोन नातेवाइकांचे नंबर उपलब्ध करून देण्याची सोयही करण्यात आली आहे. 
असे काम करेल 
मोबाइलमध्ये हे अॅप डाऊनलोड करावे लागणार असून, त्यात आपत्कालीन बटनाचा पर्याय दिला आहे. हे बटन दाबल्यानंतर आरपीएफच्या नियंत्रण कक्षाप्रमाणेच, मोबाइल क्रमांकाची नोंदणी केलेल्या नातेवाईकांना तात्काळ संदेश आणि दूरध्वनी जाणार आहे. त्यानंतर संबंधित महिलेच्या मदतीसाठी महिलांचे शीघ्र कृती दल तात्काळ तिथे पोहोचेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.जीपीएसमुळे लोकलची नेमकी जागा कळण्यात मदत होईल.  प्रवाशाच्या मोबाइलमधील बॅटरी किती शिल्लक आहे त्याचीही माहिती या अॅपद्वारे नियंत्रण कक्षाला मिळेल.महत्त्वाची बाब म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने महिला प्रवाशांनी कोणती काळजी घ्यावी याची माहिती या अ‍ॅपवर आहे.
लेखक : प्रा योगेश अशोक हांडगे 
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)

No comments:

Post a Comment