अस्सल भारतीय बनावटीची संगणक कार्य प्रणाली’: "बॉस’ प्रणाली"
भारतात संपूर्ण फ्री / ओपन सोर्स सॉफ्टवेअर वापर वाढविण्यासाठी सी-डॅक (प्रगत संगणन विकास केंद्र) ने बॉस (भारत ऑपरेटिंग सिस्टम सोल्युशन्स) विकसित केले.सध्या भारतात ‘मेक इन इंडिया’चा नारा बुलंद झाला आहे परंतु अस्सल भारतीय बनावटीच्या संगणक ऑपरेटिंग प्रणालीकडे सरकारनेच पाठ फीरविली आहे असे दिसते . केंद्रातील सरकार ‘मेक इन इंडिया’साठी आग्रह करत असतानाच खुद्द केंद्र सरकारनेच तयार केलेली संगणक प्रणाली मात्र कमालीची दुर्लक्षित झालेली आहे. जगविख्यात मायक्रोसॉफ्टच्या विंडोज या ऑपरेटिंग प्रणालीला समांतर असणारी स्वदेशी बनावटीची ‘भारत ऑपरेटिंग सिस्टिम सोल्युशन’ (बॉस) या प्रणालीकडे हेतुत दुर्लक्ष केले जात आहे कि काय अशी शंका निर्माण होऊ लागली आहे.. सीडॅक या भारतीय संस्थेच्या राष्ट्रीय मोफत आणि मुक्त सॉफ्टवेअर संशोधन केंद्राने २००७ मध्ये ‘बॉस’ ही प्रणाली विकसित केली होती . हि प्रणाली सातत्याने विकासीत करून सध्या तिची सहावी आवृत्ती बाजारात आली आहे. ही संगणक ऑपरेटिंग प्रणाली जगविख्यात मायक्रोसॉफ्टच्या विंडोज प्रणालीला पर्याय ठरू शकेल असा दावा सरकारी पातळीवरूनच करण्यात आलेला होता. मात्र, असे असतानाही ह्या प्रणालीकडे कुणी लक्ष दिले नाही . फक्त तामिळनाडू सरकारने मात्र या ऑपरेटिंग प्रणालीचा खरा वापर केला. तामिळनाडूतील सर्व सरकारी कामकाज ‘बॉस’ या प्रणालीतूनच केले जावे, असा आदेशच तेथील सरकारने काढलेला आहे. त्याप्रमाणे त्यांनी कामे केलीत आणि करोडो रुपयांचा सरकारी निधी वापरला . मात्र भारतातील ओतर कोणत्याही राज्याने मात्र या प्रणालीचा वापर केला नाही . मायक्रसॉफ्टच्या विंडोजशी समांतर असणारी अशा ‘बॉस’ या प्रणालीकडे दुर्लक्ष करणे हे देशहिताच्या दृष्टीने नुकसानदायक आहे.. खरे तर
* केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या १७ जून २०१४मध्ये एका पत्रकाद्वारे शाळांमध्ये मायक्रोसॉफ्टचे सॉफ्टवेअर्स शिकवण्याऐवजी ‘मोफत आणि मुक्त सॉफ्टवेअर’ शिकवण्याचा आदेश दिलेला होता. * यामुळे सॉफ्टवेअर खरेदीवर शाळांचा होणारा लाखो रुपयांचा खर्च कमी होईल आणि परिणामी संगणक शिकण्यासाठी विद्यार्थ्यांकडून आकारले जाणारे शुल्कही कमी होईल असा उल्लेखही पत्रकात करण्यात आला होता. * मात्र असे असतानाही हा आदेश कोणत्याही राज्यात लागू केला नाही
भारत ऑपरेटिंग सिस्टीम सोल्यूशन्स’ (बॉस) विषयी :
‘भारत ऑपरेटिंग सिस्टीम सोल्यूशन्स’ (बॉस) नावाची कार्य प्रणाली आजपासून सुमारे दहा वर्षांपूर्वी विकसित करण्यात आलेली आहे. संगणकामधे वापरण्यासाठी सर्वात महत्त्वाचे असते ती त्याची कार्य प्रणाली. सध्या "विण्डोज" ही सर्वाधिक वापर असलेली कार्य प्रणाली आहे . अधिकृतपणे ह्या कार्य प्रणालीचा वापर करण्याकरिता "मायक्रोसॉफ्ट" कंपनीला काही पैसे द्यावे लागतात. त्याचबरोबर या कार्य प्रणाली सोबत लागणाऱ्या विविध सॉफ्टवेअर्स अधिकृतपणे वापरण्यासाठीहि वापरकर्त्यांना पैसे मोजावे लागतात. म्हणून मग मुक्त स्रोत किंवा ओपन सोर्स असलेल्या लिनक्स कार्य प्रणालीमध्ये बदल करून भारतातील सीडॅक संस्थेने ‘बॉस’ची निर्मिती करण्यात आली.
यामध्ये खालील सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या
१.ऑफिस वर्ड, एक्सल, पॉवरपॉइंट अशा कार्यालयीन संबंधित कामकाजासाठी आपण विण्डोजवर एमएस ऑफिस वापरतो. याला पर्याय म्हणून या ऑपरेटिंग प्रणालीवर "लिब्रे ऑफिस"चा वापर करण्यात येतो.हे ऑफिसही पूर्णपणे मोफत असल्यामुळे त्यासाठी वेगळे पैसे मोजण्याची गरज भासत नाही. ते पूर्णत: मोफत उपलब्ध आहेत.
२ विण्डोज मध्ये असलेल्या अडोबेचे फोटोशॉपच्या एवजी या ऑपरेटिंग प्रणालीमध्ये ‘जिम्प’ नावाचे सॉफ्टवेअर आहे. ज्याचा वापर फोटो एडिटिंगसाठी करता येतो
३विण्डोज मध्ये असलेल्या इंटरनेट एक्स्प्लोरर एवजी या ऑपरेटिंग प्रणालीमध्ये सर्वाना वापरासाठी खुले असलेले क्रोम आणि मॉझिलासारखे ब्राऊझर्स आपण वापरू शकतो.
या संगणक प्रणालीचे फायदे :
१.वापराकरिता ही संगणक प्रणाली वापरण्यासाठी मायक्रोसॉफ्टच्या विण्डोजसारखीच आहे. .
२ या ऑपरेटिंग प्रणालीचे सर्वात मोठा फायदा असा आहे कि, ही प्रणाली व्हायरस मुक्त आहे. यामुळे ती वापरताना अॅण्टिव्हायरस वापरण्याची गरत भासत नाही.त्यामुळे अॅण्टिव्हायरससाठी लागणारे पैसे वाचतात
३ ही प्रणाली इंग्रजी आणि २० भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. यामुळे संगणक निरक्षर व्यक्तीला तो वापरणे सोपे जाईल. त्यामुळे ग्रामीण भागात संगणक साक्षरता करण्यासाठी ही प्रणाली भरीव कामगिरी बाजावू शकते
या संगणक कार्य प्रणाली मध्ये खालील भारतीय भाषा उपलब्ध आहे:
१ आसामी २ बंगाली ३ बोडो ४ गुजराती ५ हिंदी
६ कन्नड ७ काश्मिरी ८ कोकणी ९ मैथिली १० मल्याळम
११ मणिपुरी १२ मराठी १३ ओडिया १४ पंजाबी १५ तामिळ
१६ तेलगू १७ उर्दू १८ अरबी १९ पर्शियन २० संस्कृत
४ ही प्रणाली सरकारतर्फे मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे सर्वाना संगणक शिक्षण द्यायचे असेल तर ही प्रणाली उपयुक्त ठरू शकते. ही ऑपरेटिंग प्रणाली २००७मध्ये अधिकृतपणे बाजारात दाखल करण्यात आल्या नंतर त्याच्या आत्तापर्यंत सहा आवृत्या बाजारात आल्या आहेत.
उपलब्धता :
https://www.bosslinux.in/ या संकेतस्थळावर ही प्रणाली डाऊनलोडिंगसाठी उपलब्ध आहे.
स्वदेशी बाणा जपणाऱ्यांनी ही प्रणाली जिवंत ठेवण्याचा चंग बांधला आहे तर आपणहि या मोहिमेत सहभागी होवू या

लेखक : प्रा य़ोगेश हांडगे
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )
No comments:
Post a Comment