Friday, 27 October 2017

चार्जिंग करताना iPhone 8 Plus फुटला

चार्जिंग करताना iPhone 8 Plus फुटला

स्टेटस सिम्बॉल असलेला अ‍ॅपलचा आयफोनचे अनेक  खास फीचर्स आणि  कॅमेरॅची क्लिअ‍ॅरिटी याने तरुणाईला  भुरळ घातलेली आहे त्यामुळे तो महागडा आयफोन आपल्याकडेही  असावा असे प्रत्येकालाच वाट आहे .    iPhone 8 आणि iPhone 8 Plus भारतीय बाजारात उपलब्ध झाला आहे परंतु  भारतातील  ग्राहकांनी हवा तसा प्रतिसाद दिलेला नाही. सप्टेंबरपासून बाजारात उपलब्ध असलेल्या,उत्तम फिचर असलेल्या.iPhone 8, iPhone 8 +  मोबाईला प्रतिसाद का चांगला नाही हे जाणून घेऊया ! 
iPhone 8, iPhone 8 +  मोबाईल ची फीचर्स 

 किंमत: - आयफोन 8ची किंमत 699 डॉलर  आणि  आयफोन 8 प्लसची किंमत 799 डॉलर पासून सुरवात आहे 
कॅमेरा : दोन्हींमधेही 12 मेगाफ्किसल कॅमेरा
स्पेशल ऑडिओची सुविधा: -  ऑब्जेक्टकडे जाताच आवाज वाढतो आणि ऑब्जेक्टला मागे घेताच आवाज कमी होतो 
चार्जिग सुविधा-  वायरलेस चार्जिग  
इतर सुविधा : -‘फिंगर प्रिंट स्कॅनर’, ड्युअल कॅमेरा सेटअप
चार्जिंग करताना iPhone 8 Plus फुटला
मागच्या वर्षी २०१६ मध्ये   सप्टेंबर महिन्यात    बॅटरी खराब असल्यामुळे चार्जिंग करताना बॅटरी फुटण्याच्या घटनां सॅमसंग कंपनीच्या   Galaxy Note 7  ह्या प्रकारच्या मॉडेलच्या बाबतीत घडत होत्या त्यामुळे  अमेरिकेतील ग्राहक उत्पादन सुरक्षा आयोगाने सॅमसंग गॅलक्सी नोट 7 या स्मार्टफोनचा वापर बंद करण्याचं आवाहन केलं होत 
हा फोन चार्जिंग करताना अथवा  गेम खेळताना स्फोटाच्या जास्त घटना घडल्या होत्या त्यामुळेच 
Galaxy Note 7 चं प्रोडक्शन कायमचं बंद करण्यात आलं होतं. 
आता 'आयफोन ८ प्लस' चार्जिंग करताना फुटल्याचे वृत्त आहे त्यामुळे 'आयफोन ७ च्या तुलनेत 'आयफोन ८' आणि 'आयफोन ८ प्लस'ला ग्राहकांकडून कमी प्रतिसाद  मिळत आहे अशी शक्यता आहे  .  तैवान आणि जपानमध्ये या घटना घडल्या आहेत 
 तैवानमध्ये 'आयफोन ८ प्लस' चार्जिंग करताना फुटल्याचे वृत्त आहे  आणि  जपानमधील ग्राहकाला फुटलेल्या अवस्थेत 'आयफोन ८ प्लस'  मिळाला आहे. या दोन्ही घटनेचे फोटो संबंधित ग्राहकांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.मिळालेल्या वृत्तानुसार  तैवानमध्ये  ग्राहकाने 'आयफोन ८ प्लस'  पाच दिवस वापर केला आणि वापरल्यानंतर चार्जिंगला लावल्यावर त्याचा अचानक स्फोट होऊन  तो फुटला आणि त्याचे पार्ट्स वेगळे झाले. बॅटरी फुगल्यामुळे हा प्रकार झाल्याचा दावा ग्राहकाने केला आहे . परंतु तो चार्जिंगमुळे फुटला की अन्य तांत्रिक कारणामुळे हे अद्याप स्पष्ट झाले नाही. 
तर जपानमध्ये  एका ग्राहकाने 'आयफोन ८ प्लस' मागवल्यावर  त्याला  फुटलेल्या अवस्थेत फोन मिळाला असा दावा त्या ग्राहकाने केला आहे. 
ग्राहकाच्या दाव्यानुसार फोन आल्यानंतर बॉक्स उघडला असता  iPhone 8 Plus चे पार्ट्स वेगळे झालेले होते . 
आयफोन ८ प्लस' फुटल्याच्या या दोन घटनांची  गांभीर्याने  दखल घेऊन अॅपल कंपनीनं या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे

लेखक :  प्रा योगेश  हांडगे
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )
(handgeyogesh@gmail.com)

No comments:

Post a Comment