डिजिटल एमबीए अभ्यासक्रम
संपूर्ण जगभर डिजिटल क्रांती होत आहे त्यानुसार पंतप्रधानांनी भारताला काळाबरोबर ठेवण्यासाठी "डिजिटल इंडिया‘ची घोषणा केली.आणि त्याप्रमाणे डिजिटल सप्ताह पाळण्याचे आवाहन केले होते .
जगभरात ई-गव्हर्नन्स आणि ई-कॉमर्स क्षेत्राची व्याप्ती झपाट्याने वाढत आहे. आणि अधिकांश भारतीय ग्राहक ऑनलाइन व्यवहाराकडे वळत आहेत. या क्षेत्रात करिअरच्या मोठ्या संधी आहेत.
ई-कॉमर्स हे जलद गतीने वाढणारे आणि विकसित होणारे नवे क्षेत्र आहे आॅनलाइन शॉपिंग हा ग्राहकांसाठी एक नवीन पर्याय उपलब्ध झालेला आहे. तो विस्तारतो आहे. आॅनलाइन शॉपिंग हा घरबसल्या शॉपिंगचा नवा प्रकार सध्या भारतात रूढ होत आहे. घरबसल्या आपल्याला हव्या त्या वस्तूची, त्याच्या दर्जाची खातरजमा करून, बाजारातील किमतीपेक्षा कमी किमतीत आणि घरपोच वस्तू मिळवण्याचे साधन यामुळे निर्माण झाले आहे.
भारतातील ग्राहकांची ऑनलाइन व्यवहार करण्याची मानसिकता मोठय़ा प्रमाणावर वाढत आहे. ई-कॉमर्स हे जलद गतीने वाढणारे आणि विकसित होणारे नवे क्षेत्र आहे .
आगामी काळात जगभरातील बरीच लोकसंख्या जागतिक डिजिटल अर्थव्यवस्थेला जोडली जाणार आहे. त्यामुळेच येणारा काळ डिजिटल बिझनेस मॅनेजमेंटचा असेल . अनेक कंपन्यांनी त्या दिशेने पावले टाकायला सुरवातही केली आहे. व्यवसायाचे डिजिटल सक्षमीकरण करण्यासाठी लागणारे कौशल्य आणि संसाधने यांची त्यांना गरज भासणार आहे . ई-गव्हर्नन्स आणि ई-कॉमर्स क्षेत्राची व्याप्ती झपाट्याने वाढत आहे. अधिकांश भारतीय ग्राहक ऑनलाइन व्यवहाराकडे वळत आहेत. या क्षेत्रात करिअरच्या मोठ्या संधी आहेत.तांत्रिक कौशल्य,व्यवस्थापन आणि सर्जनशीलता असणाऱ्या उत्साही युवावर्गाला या क्षेत्रात करिअरच्या विपुल संधी मिळू शकतात
या क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रमांची आणि करिअर संधींची सविस्तर माहिती....
अभ्यासक्रम :डिजिटल व्यवसाय व्यवस्थापनातील एमबीए
डिजिटल व्यवस्थापनातील कौशल्ये विकसित करण्यासाठी आणि परिपूर्ण ज्ञान देण्याकरिता डिजिटल व्यवसाय व्यवस्थापनातील एमबीए अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठाने सुरू केला आहे . या अभ्यासक्रमात व्यवसाय विकास आणि मार्केटिंग संबंधित विषयाचा प्रामुख्याने समावेश आहे. ई-मेल मार्केटिंग, सोशल मीडिया मार्केटिंग, वेबसाईट प्लॅनिंग, मोबाइल व वेबमार्केटिंग आदी विषयांचा यात समावेश आहे.
या अभ्यासक्रमाद्वारे योग्य ती कौशल्ये विकसित करण्यासाठी प्रत्यक्षिकांवर जास्त भर दिला आहे.
"डिजिटल एमबीए अभ्यासक्रम"
आवश्यक गुण: जनसंपर्काची आवड , सोशल आणि टेक्नोसेव्हीअसावे ,व्यवस्थापनाची आवड
शैक्षणिक अर्हता : कोणत्याही शाखेतील पदवीधारक
अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी हे आदर्श करिअर ठरू शकते
संस्था :
१ MET अशियन मॅनेजमेंट डेव्हलोपमेंट सेंटर ,मुंबई
वेबसाईट :http://www.met.edu
प्रवेश प्रक्रिया:CAT किंवा MCT + गटचर्चा + व्यक्तिगत मुलाखत + कार्य अनुभव आणि शैक्षणिक + साइकोमेट्रिक कसोटी
शुल्क: अधिक माहितीकरिता संस्थेच्या वेबसाईटला भेट द्यावी
२ नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे डिजिटल व्यवस्थापन महाविद्यालय
"इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, चिपळुण"महाराष्ट्र
वेबसाईट:http://www.neims.org.i n
प्रवेश क्षमता : 60 जागा,
शुल्क : अधिक माहितीकरिता संस्थेच्या वेबसाईटला भेट द्यावी
करिअर संधी
- ज्यांना विपणन क्षेत्रात किंवा डिजिटल कंपन्यात करिअर करायचे आहे, त्यांना हा अभ्यासक्रम उपयुक्त आहे,
अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर
-इंटरनेट मार्केटिंग स्पेशालिस्ट
-डिजिटल सेल्स एक्झिक्युटिव्ह,
-डिजिटल बिझनेस मॅनेजर
आदी आदी करिअरच्या संधी ई-कॉमर्सच्या कंपनीमध्ये मिळू शकतात
लेखक : प्रा योगेश हांडगे
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )
No comments:
Post a Comment