विविध उपयोगी मोबाईल योगा अॅप्स:
विविध कॅटॅगिरीधील सर्वात जास्त उपयोगी योगा अॅप्सचा आपण उहापोह करू या !
योगा अॅप्स
आज सर्वीकडे व्यक्तिगत आरोग्याकडे आणि फिटनेसकडे गांभीर्यानं लक्ष देण्याकडे अनेकांचा कल वाढत चालला आहे.
योगाची महती विविध माध्यमांद्वारे सतत कानी पडत आहे त्यामुळे अनेक व्यक्ती आवर्जून योग शिकण्याचा प्रयत्न करताहेत. पण अनेकांना योगाचे क्लासेस लावणे शक्य नसते. त्यामुळे योगाची आवड असणाऱ्यांसाठी योगासन, डेली योगा असे अॅप्स उपलब्ध आहेत या अॅप्सचे वैशिठ्य असे आहे कि भारतातील सर्वच भाषांमध्ये हे उपलब्ध आहे . या लोकप्रिय ठरलेल्या प्रत्येक अॅपमध्ये वर्गवार विभागणी असून प्रत्येक आसन कसे करायचे आणि त्याचे फायदे यांची सविस्तर माहिती कृतीसह दिलेली आहे.
तसेच गूगल फिट व फिटनेस ट्रेनर या मोबाइल अॅप्समध्ये नेहमीच वर्कआऊट प्लॅन आपण सेव्ह करू शकतो . हे अॅप्स अँड्रॉईड तसेच काही जावा फोन्समध्ये प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करू शकतो.
डेली योगा
योगाचे महत्त्व पटवून देण्यासाठी ‘डेली योगा’ या अॅपची मदत होते . या अॅपमध्ये योगाचे महत्त्व आणि त्याचे विविध प्रकार यांची विविध योगासने सचित्र विस्तृत माहिती आहे. तसेच कोणती आसने किती अवधीत करायची आणि कशी करायची याबाबत माहिती आहे.
यात 500हून अधिक आसनांची माहिती, एचडी फॉरमॅटमधील व्हिडिओ उबलब्ध आहे . आणि प्रत्येक व्हिडिओला सुश्राव्य मंद संगीताची जोड दिलेली आहे हे अॅप ऍन्ड्रॉईड 3.0 आणि त्यापुढील ओएससाठी उपलब्ध आहे.
पॅरेंट योगा
विविध भाषांमधून उपलब्ध असणाऱ्या या अॅपमध्ये योग तज्ज्ञांशी सवांद साधण्याची संधी यात युजर्सना उपलब्ध आहे .
तसेच महिलांना गरोदर काळात आणि त्यानंतर गर्भवती महिलांनी बाळाची तसेच स्वत:ची कशीे काळजी घ्यावी, कोणती योगासने करायची याची विस्तृत माहिती यांत दिली आहे.
नॅचरल फेसलिफ्ट
महिलांसाठी हे ऍप अतिशय उपयुक्त असणारे हे अॅप तब्बल 85 भाषांमधून माहिती देते. या भाषांमध्ये इंग्रजी आणि हिंदी या भाषांचादेखील समावेश आहे. . बहुतेक महिला स्किनकेअर उत्पादनांवर सर्वाधिक खर्च करतात.परंतु त्याऐवजी चेहऱ्याचे काही व्यायाम केल्यास चेहरा आणखी टवटवीत दिसेल.कारण चेहऱ्यावरील सौंदर्य आणखी खुलविण्यासाठी फेशियल योगा महत्वाचा ठरतो हे अॅप तुम्हाला फक्त दहा सोपे व्यायाम सांगितले आहेत. यामुळे चेहऱ्यावरील फॅट्स कमी होण्यास मदत होते.
बाबा रामदेव
या अॅपमध्ये सर्व आसने आणि प्राणायाम मुद्रा व्हिडिओसहित उपलब्ध आहेत. तसेच फॅट कमी करण्यासाठी तसेच उच्च रक्तदाब,मधुमेह यासारख्या विशिष्ट रोगासाठी योगासने, प्राणायाम यांचे वेगळे व्हिडिओ यावर उपलब्ध आहेत.
लेखक : प्रा योगेश हांडगे
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )
No comments:
Post a Comment