'एम-इंडिकेटर'वर एसटीचे वेळापत्रक
वाहतुकीच्या या विविध मार्गासाठी वेळापत्रक दर्शवणारं अॅप ‘एम इंडिकेटर’
प्रवाशांसाठी
उपयुक्त ठरलेल्या 'एम-इंडिकेटर' या अॅपवर उपनगरीय रेल्वे, एक्स्प्रेस
यांचे वेळापत्रक आहे. या अॅपच्या अपडेट सुविधेत एसटी महामंडळ आणि
रेल्वेच्या सुधारित वेळापत्रकासह अन्य बाबींचा समावेश करण्यात आला आहे.
राज्य परिवहन विभागाने प्रायोगिक तत्त्वावर एसटी बसचे वेळापत्रक अॅपच्या
अपडेट व्हर्जनमध्ये उपलब्ध करून दिले आहे.
तसेच राज्य परिवहन
मंडळाच्या बससोबत वातानुकूलित श्रेणीत धावणारी 'शिवनेरी' बसची माहिती
स्वतंत्रपणे उपलब्ध करून देण्यात आली आहे. . या अॅपमुळे लाखो प्रवाशांना
घरबसल्या बस क्रमांकासह सर्व माहिती मिळणार आहे. शिवनेरीच्या ११७ बसेस
नियमित धावत असून प्रवासी संख्या ६० हजारांच्या आसपास आहे. बस डेपोचे फोन
क्रमांक अँपमध्ये नमूद असून आणखी बऱ्याच सुविधांचा लाभ एसटी प्रवाशांना
घेता येणार आहे.
अॅपमध्ये राज्यातील बस डेपोचे दूरध्वनी
क्रमांक आहेत. रेल्वेचे वेळापत्रक पूर्वीपासून अॅपवर आहे. सुधारित
व्हर्जनमध्ये पीएनआर नंबर, तिकिटांचे स्टेटस, ट्रेनमधील उपलब्ध आसन
व्यवस्था, ट्रेनचे तिकीट यांचाही समावेश आहे. अॅपमध्ये मोनो, मेट्रो,
लोकल, बस, एक्स्प्रेस यांचे वेळापत्रक, तर रिक्षा, टॅक्सी आणि फेरी बोट
यांचे दरपत्रक आणि वेळापत्रक आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या
एसटी बसेसच्या वेळापत्रकाचा समावेश प्रथमच एम इंडिकेटर ॲपमध्ये झाला आहे.
एसटीची प्रवासी संख्या जवळपास ६० ते ७० लाख आहे. सध्याच्या घडीला राज्यभरात
नियमित एकूण १८ हजार एसटी बसेस धावतात. एम इंडिकेटर ॲपच्या माध्यमातून
यापुढे लाखो प्रवाशांना एसटी बसेसची अपडेट माहिती मिळू शकणार आहे. बस
क्रमांकासह सर्व माहिती प्रवाशांना मिळेल. एका स्थानकातून निघालेली बस
कुठपर्यंत पोहोचली, याबाबत बसच्या सद्यस्थितीची माहिती प्रवाशांना मिळणार
आहे. त्यामुळे बसच्या प्रतीक्षेत बसलेल्या प्रवाशांना कोणती बस स्थानकात
दाखल झाली आहे हे पाहण्यासाठी धावपळ करण्याची गरज पडणार नाही
भारतीय
रेल्वेचे ऑफलाईन वेळापत्रक एम इंडिकेटर अँपमध्ये आधीपासूनच उपलब्ध असले
तरी सुधारित अँपमध्ये पीएनआर नंबर, स्टेटस पाहणी, कोणत्या गाडीत कुठल्या
प्रकारच्या डब्यात आसन उपलब्ध आहेत.
तिकीट आरक्षित करणे आहे सोपे
आसनांचे
तिकीट दर किती आहेत, यासंदर्भातील सर्व माहिती रेल्वे प्रवाशांना प्राप्त
होईल. याशिवाय प्रवासाच्या ६ तासांपूर्वी प्रवाशाला रिमाईंडर पाठवणे, तसेच
स्थानक येण्यापूर्वी २० मिनिटे आधीच एम इंडिकेटरचे ऑटोमॅटिक अलार्म
वाजेल, जेणेकरून प्रवाशांना इच्छित स्थानकावर उतरता येईल. त्याचप्रमाणो
रद्द व वेळेत बदल झालेल्या रेल्वे गाड्यांची सूचना ॲपमधून प्रवाशांना
मिळेल. रेल्वेचे महत्त्वपूर्ण दूरध्वनी क्रमांकही अॅपमध्ये समाविष्ट आहेत.
m-Indicator
– Mumbai हे अॅप अँड्रॉइडधारकांसाठी गुगल प्ले स्टोअर तसेच आयफोन, आयपॅड
आणि आयपॉड टच धारकांसाठी एॅपल स्टोअरवर उपलब्ध आहे. या अॅपच्या धर्तीवरच
पुणे परिवहन सेवेची माहिती देणारे p-Indicator – Pune PMPML & BRT&
इफळ हे अॅपसुद्धा गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.
अॅपवर मिळणारी माहिती
या
अॅपवर मध्य, पश्चिम आणि हार्बर या तीनही सेवांचे पूर्ण टाइम टेबल या
अॅपमधे भरलेले आहे. तुम्ही रेल्वेच्या कोणत्या स्थानकावर उभे आहात आणि
कोणत्या दिशेने प्रवास करायचा आहे हे सांगितल्यावर त्या दिशेने जाणाऱ्या
पुढील सर्व गाडय़ांचे वेळापत्रक दाखवले जाते. त्या कोणत्या प्लॅटफॉर्मवर
येतात त्याचीही माहिती दिली जाते. त्या गाडय़ा जलद आहेत की धीम्या हेही
आपल्याला कळते. हे झाले उपनगरी गाडय़ांबद्दल. संपूर्ण भारतातून मुंबईला
येणाऱ्या आणि मुंबईहून संपूर्ण भारतात जाणाऱ्या लांबपल्ल्याच्या गाडय़ा (मेल
आणि एक्स्प्रेस, पॅसेंजर) यांच्या वेळापत्रकांची माहितीही येथे देण्यात
आलेली आहे. जर तुमचे एखाद्या गाडीचे रिझव्र्हेशन वेटिंग लिस्टमधे असेल तर
पीएनआर क्रमांकाची चौकशीही या अॅपद्वारे करता येते.
लेखक : प्रा योगेश अशोक हांडगे
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)
No comments:
Post a Comment