१ Android अँड्रॉइड फोनवरून ......... अँड्रॉइड डाटा रिकवरी अॅप
स्मार्टफोनची मेमरी वाढविण्यासाठी आपण बर्याच वेळा फोनमधील अनेक फाईल्स हटवतो,
परंतु हे करतांना एखादी महत्वाची फाईल अथवा महत्वाचा डेटाहि त्यांच्याबरोबर डिलीट होतो त्यामुळे आपल्याला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते परंतु आता पश्चात्ताप करण्याची आवश्यकता नाही Android फोनवरून डिलीट झालेला डेटा परत कसा मिळवायचा त्याचा आढावा घेऊ या !
उपाय .
अँड्रॉइडफोन साठी फ्री डेटा रिकवरी अॅप: इजी यूज मोबी सेवर किंवा एंड्रायड डाटा रिकवरी अॅप
>>अँड्रॉइड फोनवरून डिलीट झालेला डेटा परत मिळविण्याकरिता प्रथम आपण आपल्या संगणकावर इजी यूज मोबी सेवर किंवा एंड्रायड डाटा रिकवरी अॅप यासारखे काही अॅप्स इंस्टॉल करावे लागेल. .चाचणीसाठी हे अॅप्स विनामूल्य उपलब्ध आहे. अँड्रॉइड फोनवरील डेटा पुन्हा प्राप्त करण्याकरिता आपल्याला फोनवर हे टाकावे लागतील
>> संगणकात डेटा डाटा रिकवरी अॅप इंस्टॉल करा. त्यानंतर USB केबल वापरून स्मार्टफोन संगणकाला कनेक्ट करून घ्या आपल्याला आपल्या स्मार्टफोनचा फुल एक्सेस द्यावा लागेल.
>> त्या नंतर स्मार्टफोन च्या सेटिंग्जवर जाऊन अबाउट फोन को सेलेक्ट करा . येथे तुम्हाला बिल्ड नंबर ऑप्शन उपलब्ध असेल .जोपर्यंत ‘डेवलपर्स ऑन’ आप्शन आपल्याला दिसत नाही तोपर्यंत बिल्ड नंबर ऑप्शन या पर्यायावर क्लिक करा .
>> नंतर सेटिंगमध्ये डेवलपर्स आप्शनवर जाऊन फोनमधील अॅप डीबगिंग सक्षम करा
>> मोबाईलशी कनेक्ट झाल्यावर आपल्याला एक्सेस संदर्भात काही मेसेज दाखवेल , या मेसेजवर ओके टिक करा
>> आता आपला मोबाईल अॅपशी जोडल्याबरोबरच कोण कोणते डॉक्यूमेंट आपल्याला रिकवर करून पाहिजे यासंबंधित आपल्याला विचारणा होईल जे डॉक्यूमेंट रिकवर झालेले पाहिजे ते सिलेक्ट करा , हे सिलेक्शन झाल्यावर एप्लीकेशनचे काम सुरु होईल
>> एप्लीकेशन सुरु करणे म्हणजे आपला स्मार्टफोनची रिकवरी प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेस एक तास किंवा त्यापेक्षा जास्त लागू शकतात. हि प्रक्रिया जो पर्यंत सुरु आहे तोपर्यंत आपला स्मार्टफोन संगणकाशी कनेक्ट ठेवा. चुकून डिस्कनेक्ट झाल्यास, रिकवरी प्रक्रिया थांबेल.
महत्वाचे : हे लक्षात ठेवा कीहे एप्लीकेशन आपल्या स्मार्टफोनमधील सर्व डेटा रिकवर होईल याची गॅरंटी देत नाही परंतु परिणाम बरेचसे सकारात्मक आहेत.
२. मेमरी कार्डावरून डेटा रिकवर कसा करावा?
SD कार्ड मध्ये आपले फोटो, व्हिडिओ आणि इतर मौल्यवान माहिती आहे त्यामुळे ते फार महत्वाचे आहे .
परंतु चांगल्या पद्धतीने/काळजीने ते वापरले नाही तर ते खराब होऊ शकते आणि त्यामुले त्यातील आपले फोटो, व्हिडिओ नष्ट होण्याचा धोका असतो .
काही खराबी असेल तर कार्ड कधीही फॉरमॅट करू नका. थोडे करून प्रयत्न करून फोटो आणि व्हिडिओ काढला पाहिजे.
काहीवेळा कार्ड रीडरमध्ये प्रॉब्लेम्स असू शकतात, त्यामुळे कार्ड कार्ड रीडरवर कार्ड चालू नसल्यास इतर कार्ड रीडरवर ठेवून तपासून घ्यावे .
काही कार्ड रीडर मायक्रो एसडी आणि स्टैंडर्ड एसडी कार्ड दोन्ही वाचू शकतात.
मेमरी कार्डसाठी फ्री डेटा रिकवरी अॅप: डिस्क डिगर, ज़ार आणि ईज़अस फ्री डेटा रिकवरी अॅप अॅप्स डाउनलोड करू शकता परंतु हे अॅप सर्व फायलिची रिकवरी होईल हि याची कोणतीही हमी देत नाही .
बऱ्याचदा रिकवरी च्या वेळी फाइल चे नाव बदलते किंवा फाइल करप्ट होते .
काही फ्री डेटा रिकवरी अॅप किंवा सॉफ्टवेअर सर्व फायली रिकवरी करत नाहीत त्यावेळी विकतच्या अॅप किंवा सॉफ्टवेअरचा पर्याय आपल्याकडे असतो
ज़ार किंवा इतर अॅप इंस्टॉल केल्यानंतर, कार्ड कार्ड रीडरमध्ये ठेऊन सॉफ्टवेअर किंवा अॅप वर क्लिक करा
थोड्या वेळाने आपल्या स्क्रीनवर 'इमेज रिकवरीचा पर्याय' मिळेल ज्याकरुन आपण फोटो रिकवर करण्याचे काम सुरू करू शकता.
महत्वाचे : फाईल रिकवर झाल्यावर , फाईल रिकवर झाली आहे ती कुठे सेव करायची आहे याची विचारणा होईल .
अशा फायली कॉम्प्युटरच्या हार्ड डिस्कमध्ये सेव/जतन करा या प्रक्रियेस काही वेळ लागेल.
यानंतर, सर्व फायली पुनर्प्राप्त केल्या गेल्या किंवा नाहीत ते तपासून पहा.
लेखक : प्रा योगेश हांडगे
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )
No comments:
Post a Comment