Tuesday, 3 October 2017

चीनी स्मार्टफोन कंपन्या स्मार्टफोनद्वारे ग्राहकांची वैयक्तिक माहिती चोरत असल्याचा संशय आहे

सावधान ! स्मार्टफोन वापरतांना काळजी घ्या ! मोबाईल फोन्सवर अनेक प्रकारचे 'अटॅक' होत आहेत, चीनी स्मार्टफोन कंपन्या  स्मार्टफोनद्वारे ग्राहकांची वैयक्तिक माहिती चोरत असल्याचा संशय आहे ...."UC ब्राऊजरवर भारतीय ग्राहकांचा डेटा चीनला पाठवल्याचा आरोप होत आहे. "
                               


नुकतीच  स्मार्टफोनद्वारे ग्राहकांची वैयक्तिक माहिती चोरत असल्याचा संशयावरून केंद्र सरकारने चीनी स्मार्टफोन कंपन्यांना  नोटीस बजावलीय आहे .
 स्मार्टफोनमधील कॉन्टॅक्ट लिस्ट आणि मेसेजेसमधील वैयक्तिक माहिती चोरली जात असल्याचा संशय सरकारने व्यक्त केलेला आहे .
राहकांची वैयक्तिक माहिती चोरत असल्याचा संशय सरकारला आहे.
भारतात प्रचलित असणाऱ्या स्मार्टफोनच्या  अधिकतर कंपन्या चीनच्या आहेत.सध्या भारत आणि चीनच्या परस्पर संबंधात  प्रचंड तणाव आहे.   त्यामुळे या कंपन्या ग्राहकांची माहिती हॅक करण्याची शक्यता नाकारता येत नाही
त्यामुळे  ओप्पो, व्हिवो, श्योमी आणि जिओनी सारख्या चीनी कंपन्यांना नोटीस पाठवून  त्यांच्याकडून याप्रकरणी उत्तर मागितल्याचे वृत्त आहे . 
फक्त चीनी कंपन्यांनाच ही नोटीस पाठवण्यात आलेली नाही  तर स्मार्टफोन बनवणाऱ्या  अॅपल, सॅमसंग या कंपन्यांबरोबरच  भारताचीच मायक्रोमॅक्स कंपनी अशा २१ कंपन्यांचा यात समावेश आहे.
तसेच  चीनची  प्रसिद्ध कंपनी अली बाबाचं UC . या ब्राऊजरवर भारतीय युजर्सशी संबंधित माहिती लीक करण्याचा आरोप होत आहे. मोबाईलमध्ये UC ब्राऊजर चालू करताच वायफाय डिटेल आणि नेटवर्क इन्फॉर्मेशन चीनच्या सर्व्हरला मिळते.

UC ब्राऊजरवर भारतीय ग्राहकांचा डेटा चीनला पाठवल्याचा आरोप
अनेक भारतीय मोबाईलमध्ये UC ब्राऊजर वापरत  आहेत.  UC ब्राऊजर हे चीनची  प्रसिद्ध कंपनी अली बाबाचं ब्राऊजर आहे. या ब्राऊजरवर भारतीय युजर्सशी संबंधित माहिती लीक करण्याचा आरोप होत आहे.
मोबाईलमध्ये UC ब्राऊजर चालू करताच वायफाय डिटेल आणि नेटवर्क इन्फॉर्मेशन चीनच्या सर्व्हरला मिळते.
सुत्रांच्या मते, UC ब्राऊजरने युजर्सच्या मोबाईल नंबरसोबतच इतरही माहिती चीनला पाठवली आहे. UC ब्राऊजर भारतीय ग्राहकांचे इंटरनॅशनल मोबाईल सबस्क्राईबर आयडेंटिटी आणि आयएमईआय म्हणजेच इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटीची माहिती चीनमध्ये असलेल्या रिमोट सर्व्हरला पाठवली आहे.
भारतीय युजर्सच्या मोबाईलमधील डेटा कथित स्वरुपात लीक करत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी केंद्र सरकारने चौकशीही सुरु केली आहे. चौकशीत  दोषी आढळल्यास UC ब्राऊजरवर बंदी घालण्यात येण्याची शक्यता आहे .


स्मार्टफोनमध्ये कुठलेही अॅप्लिकेशन अथवा गेम्स डाऊनलोड आणि इन्स्टॉल करतांना काळजी घ्या.
सावधान ! स्मार्टफोनमध्ये कुठलेही अॅप्लिकेशन अथवा गेम्स डाऊनलोड आणि इन्स्टॉल करतांना काळजी घ्या. .
हे करतांना कारण बहुतेकवेळा आपण  अॅपची 'टर्म्स अँड कंडीशन' सविस्तर न वाचता 'अॅक्सेप्ट' हा पर्याय निवतो.
जेव्हा तुम्ही 'अॅक्सेप्ट' हा पर्याय  निवडता तेव्हा स्मार्टफोन मधील फाईल्स, फोन नंबर्सची यादी,सर्व माहिती, फोटो,तुमचं लोकेशन अशा अनेक महत्वाच्या गोष्टी त्या अॅपला वापरण्याची परवानगी तुम्ही देत असता. अशा रीतीने नकळत तुम्ही तुमच्या फोनचा कंट्रोल त्या अॅपच्या कंपनीच्या हातात देत असता.आणि हि डाऊनलोड केलेली अॅप तुमच्या फोनमधील सर्व माहिती त्यांच्या कंपनीला पोहचवितात
'अॅप्लिकेशन कंपन्या 'युजर एक्सपिरिअन्स'ची माहिती मिळवण्याच्या नावाखाली तुमच्या घडामोडींवर लक्ष ठेवू शकतात. परंतु मोबाइलमधल्या कुठल्याही गोष्टीचा उपयोग कंपनी स्वतःच्या वापरासाठी करू शकत नाही.
स्मार्टफोनमधील अनेक अॅप्स संर्टफोनवरील घडामोडींवर लक्ष ठेवून फोनमधली काँटॅक्ट लिस्ट,व्हिडिओ, फोटो आणि इतर महत्वाची माहिती महत्त्वाची कागदपत्रं चोरून त्यांच्या कंपनीला पोहचवितात 
अनेक प्रकरणात काही कपंनीचे अॅप्स महिलांच्या मोबाईलमधील त्यांचे फोटो चोरून फोटोशॉपच्या सहाय्यानं तिच्या फोटोमध्ये फेरफार करून अश्लील वेबसाइटवर अपलोड केल्याचं सायबर सेलला तपासात आढळून आलेलं आहे
स्मार्टफोन वापरतांना खालील काळजी घ्या :
० खासगी माहिती किंवा फोटो मोबाइलमध्ये ठेवू नका
० नेट बँकिंग व इमेलचे पासवर्ड वारंवार बदलत रहा.
०उपयोगात नसलेले अॅप आणि गेम्स अनइन्स्टॉल करा.
० आठवड्यला  मोबाइलमधली मेमरी क्लीन करा.
० फोनमधील माहिती  चोरीला गेल्यास तत्काळ पोलिसांच्या सायबर क्राईम सेलशी संपर्क साधून तक्रार नोंदवा.
० अनोळखी व्यक्तींशी अॅपद्वारे खासगी संवाद करू नये.
स्मार्टफोन वापरतांना काळजी घ्या
दैनंदिन कामांसाठी मोबाईल फोनचा वापर करणा-यांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे . सर्वीकडे मोबाईलचा वापर जास्त होत आहे
मोबाईलला आजकाल आवश्यक वस्तूंमध्ये मोडले जात आहे. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांपासून ते जवळपास सर्वच वयोगटातील मोबाईल धारक  आपल्याला पाहायला मिळतात
 अनेकांना तर स्मार्टफोनची इतकी सवय असते की, त्यांना फोनशिवाय एक मिनीटपण राहणे फार अवघड आहे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपण्यापर्यंत स्मार्टफोन बहुतेकांना गरजेचाच झालेला आहे
मोबाईल फोन हरवीला किंवा चोरीला गेला की त्यात असलेला आपला प्रायव्हेड डेटा दुसऱ्या कुणाच्या  हाती जाण्याची शक्यताच अधिक असते. आणि यामुळे आपल्या वैयक्तिक माहितीचा दुरुपयोग होण्याची शक्यता जास्त असते . स्मार्टफोनमध्ये  क्रेडिट कार्डची माहिती, बँक खाते क्रमांक, पासवर्डस इत्यादी पर्सनल माहिती ठेवतो तसेच व्यावसायिक मोबाईलमध्ये कॉर्पोरेट डॉक्युमेंट्सही सेव्ह करतात. ज्यामुळे वेळेवर ती त्यांना उपलब्ध होतात परंतु  मोबाईल हरवल्यास ही अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या हातून निघून जाते.
त्यामुळे स्मार्टफोन वापरतांना खालील काळजी घ्या :
१. त्यामुळे मोबाईलच्या  मेमरी कार्डमधील डेटा 'इनक्रिप्ट' करून ठेवावा त्यामुळे डेटा 'इनक्रिप्ट' केल्याने डेटा दुसऱ्याच्या हाती गेला तरी  तो सुरक्षित राहील .
स्मार्टफोनमधील मेमरी कार्डमधील डेटा 'इनक्रिप्ट' करून ठेवल्यास तो डेटा इतरांना वापरता येणार नाही .
२. स्मार्टफोनमध्ये बनावट अॅप्लिकेशन्स इन्स्टॉल करणे टाळा . अॅप्लिकेशन्स बनावट मेल किंवा बनावट मेसेजमधून आलेल्या लिंकवरून डाउनलोड करु नका .
३. स्मार्टफोनला  पासवर्ड ठेवा. त्यामुळे  काही काळ  डेटा सुरक्षित राहील . आणि काहीवेळा शोधाशोध केल्यावर तेवढ्या वेळात फोन सापडण्याची शक्यता असते.
४. सार्वजनिक ठिकाणी असलेल्या फ्री वायफायना मोबाईल कनेक्ट करू नका .
कारण इथे मोबाइल अटॅकर्सदेखील कार्यरत असतात ते  थोडा प्रयत्न करून वायफायना कनेक्ट केल्यानंतर तुमचा पर्सनल डाटा मिळवू शकतात. 
५. फोनमधील वाय-फाय, ब्लूटूथ बंदच ठेवा.
मोबाईल फोन्सवर स्पायवेअर अटॅक, सर्वेलिअंस अटॅक फिश‌िंग अटॅक असे अनेक 'अटॅक' होत आहेत तेव्हा सावध रहा
>> सर्वेलिअंस अटॅक: सर्वेलिअंस अटॅकमध्ये  अटॅकर्स मोबाईल जीपीएसला टार्गेट करून तुमच्या दिनचर्येची  माहिती मिळवून तिचा वापर अगदी घर फोडण्यासाठीदेखील करतात  . 
>>स्पायवेर अटॅक: यामध्ये फोनमधील फसवे अॅप्लिकेशन्स तुमची पर्सनल माहिती चोरतात .
>>फिश‌िंग अटॅक: यामध्ये  फोनमधील पासवर्डस्, क्रेडिट कार्ड नंबर, अशी माहिती मेलमधून अथवा बनावट मेसेज भूलथापा देवून  फसवून  तुमच्याकडून घेतली जाते.
लेखक : प्रा य़ोगेश हांडगे
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत)

No comments:

Post a Comment