Tuesday, 3 October 2017

भाषा आणि व्याकरण शिकविणारी मोबाइल अ‍ॅप्स

भाषा आणि व्याकरण शिकविणारी मोबाइल अ‍ॅप्स 
मोबाइल अ‍ॅपने  भाषा शिका :'कल्चरअॅली'
सोप्या पद्धतीने कुठलीही भाषा कशी शिकता येईल, अशा मोबाइल अॅपचा या लेखात आपण उहापोह करू या ! 
बहुसंख्य लोकांना एखादी तरी परदेशी भाषा शिकायची इच्छा असते. पण आपल्या वेळेनुसार निवांतपणे भाषा शिकण्याची फारशी साधनंच उपलब्ध नसल्यानं अनेक अडचणी येतात. यावर  उपाय म्हणून जयपूरस्थित निशांत पटणी आणि प्रांशू भंडारी नावाच्या तरुण इंजिनीअर जोडप्याने इंग्रजी शिकविणाऱ्या 'कल्चरअॅली' नामक अॅपची निर्मिती केली आहे, २०१२ च्या ऑक्टोबरमध्ये ‘कल्चरअ‍ॅली’ हे अ‍ॅपही लाँच झालेल्या या अॅपद्वारे मँडरिन, स्पॅनिश या परदेशी भाषांसह इंग्रजी,हिंदी  आणि पंजाबी अशा अनेक भाषा  शिकता येतात.आतापर्यंत जगभरातल्या २२० देशांमधील लोकांनी हे अ‍ॅप डाउनलोड करून घेतलंय. गुगलच्या प्ले स्टोअरमधलं हे लोकप्रिय अ‍ॅप ठरलंय. या अ‍ॅपला जगभरातूनच प्रचंड प्रतिसाद मिळतोय. 
‘कल्चरअॅली’मध्ये सोशल साइट्चाही प्रभावी मदत घेण्यात आली आहे. वापरकर्त्यांनी  ‘कल्चरअॅली’त एकदा लॉग इन केलं की ट्वीटर तसंच फेसबुकवरच्या न्यूजफिडमध्ये त्या भाषेतले शब्द टाकले जातात. यामुळे विद्यार्थी भाषा जास्त चांगल्या प्रकारे जाणून घेऊ शकतो. फेसबुकवर ब्राउिझग करतानाही तो भाषेच्या सतत संपर्कात राहतो. यामुळे त्या भाषेत संवाद साधणं सोपं होऊन जातं. नवे शब्द सतत डोळ्यांखालून गेल्याने विद्यार्थ्यांची शब्दसंपदा वाढते. 
दृकश्राव्य माध्यमाचा कल्पक वापर व विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या भाषेत संवाद साधण्याची संधी ही दोन  वैशिष्टय़े या अ‍ॅपची आहेत . 
विद्यार्थ्यांना भाषेशी जोडून ठेवण्याच्या दृष्टीनं, संवाद साधण्याच्या माध्यमातून कल्चरअॅली अॅपची रचना करण्यात आली आहे.
इंग्रजी व्याकरणावर आधारित अ‍ॅप्स 
इंग्रजी व्याकरणावर आधारित असलेली अनेक अ‍ॅप्स आज उपलब्ध आहेत. त्यातील काही मोजके अ‍ॅप्स 
१)  Johnny Grammarls word challenge.. ब्रिटिश कौन्सिलच्या या अ‍ॅप्समध्ये  ग्रामर, वर्डस् आणि स्पेलिंग या तीन कॅटेगरीज आहेत. प्रत्येकात एका मिनिटात जास्तीत जास्त किती प्रश्न तुम्हाला सोडवता येतात हे बघणारा खेळ आहे. 
व्याकरणातील बारा वेगवेगळ्या पाठांवरील प्रश्नमंजूषा यात आहेत. 
वर्डस् या भागात वेगवेगळ्या ठिकाणी वापरले जाणारे शब्द ओळखायचे असतात. 
तसेच स्पेलिंग या विभागात लिहिताना हमखास चुकणाऱ्या स्पेलिंगपैकी योग्य स्पेलिंग निवडायचे असते. एखाद्या प्रश्नाचे उत्तर येत नसेल तर तो प्रश्न सोडून  पुढील प्रश्नावर जाता येते . या अ‍ॅपमधील प्रश्नमंजूषा सोडवताना तुम्ही लॉगिन केले असेल तर तुमचा स्कोर लीडर बोर्डवर पोस्ट करू शकता.  तो स्कोर फेसबुकवरही  शेअर करण्याचा पर्याय आहे 
२) LABsterzz चे English Grammar Test : हे टू इन वन इंग्लिश लर्निग अ‍ॅप आहे. यात इंग्रजी भाषेतील काही मूलभूत गोष्टी शिकायला मिळतील. जसे की अवतरण चिन्हांचा वापर, घडय़ाळातील वेळ सांगण्याची योग्य पद्धत,  याशिवाय  अठरा भागांत विभागलेले व्याकरणाचे पाठ शिकायला मिळतात  . तसेच व्याकरणाच्या पाठांवर आधारित असलेल्या वीस प्रश्नमंजूषा येथे उपलब्ध आहेत. स्पर्धात्मक परीक्षांमधे रुची असलेल्यांसाठी येथे टेस्ट दिल्यावर गोल्ड, सिल्व्हर आणि ब्राँझ अशी डिजिटल पदके प्रदान केली जातात..
३) Sevenlynx ¨¹FF English Grammar Test : या अ‍ॅपमध्ये व्याकरणाचे वीस वेगवेगळ्या पाठांत विभाजन केले आहे आणि प्रत्येक पाठात तीस प्रश्न आहेत. तसेच सर्व पाठांवर आधारित मिश्र प्रश्नमंजूषादेखील आहेत. प्रश्नमंजूषा सोडवून झाल्यावर किती उत्तरे बरोबर आली, किती चुकली आणि किती सोडून दिली याचे प्रगतिपत्रक दिसते. चुकलेल्या प्रश्नांचे अतिशय सोप्या शब्दात स्पष्टीकरण दिले जाते. 
लेखक : प्रा य़ोगेश हांडगे 
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )

No comments:

Post a Comment