Tuesday, 3 October 2017

व्हॉटस्अ‍ॅप वेब

व्हॉटस्अ‍ॅप वेबआपल्या देशामध्ये तरुणाई मोबाईलवरच व्हॉट्सअॅप वापरते परंतु व्हॉटस्अ‍ॅप वेब पर्सनल कॉम्पुटरवरसुद्धा इन्स्टॉल करू शकतात .जे लोक पर्सनल कॉम्पुटर किंवा लॅपटॉपवर कामात कायम व्यस्त असतात . आणि त्यामुळे सतत  मोबाईल वापरात नाही त्यांच्याकरिता"व्हाट्सएप वेब" उपलब्ध आहे.ज्यामुळे व्हॉट्सअॅप हे फेसबुक सारखेच कॉम्पुटर किंवा लॅपटॉपवर हे  वापरता येते. आणि परदेशात ते चांगलेच लोकप्रिय आहे . भारतात इन्स्टेंट मेसेजिंग अॅप व्हॉटसअपचे जवळपास २० करोड यूझर्स आहेत स्मार्ट फोन वर अधिराज्य गाजवणारे मेसेजिंग अ‍ॅप व्हॉटस्अ‍ॅप  कॉम्प्युटरवरसुद्धा वापरु  शकतात . व्हॉटसअपला  फेसबुक ने खरेदी केल्या नंतर त्यांनी व्हॉटस्अ‍ॅप वेब या नावाने ही सेवा सुरु केली आहे

व्हॉट्सअ‍ॅप वेब कसे वापरावे :
>>
१) व्हॉटस्अ‍ॅप वेब सेवेचा  लाभ घेण्यासाठी गुगलक्रोम ब्राऊजर वापरावे.
२) प्रथम तुमच्या मोबाईलवरील व्हॉटस्अ‍ॅप अपडेट करून घ्यावे .
३)  व्हॉटस्अ‍ॅप अपडेट झाल्यानंतर  त्याच्या मेनू मध्ये व्हॉटस्अ‍ॅप वेब नावाचे एक आॅप्शन येईल.तो ओपन करा तिथे QR कोड स्कॅन करण्याचा पर्याय  येईल तो तसाच ठेवा
३) त्यानंतर कॉम्पुटरवर गुगलक्रोम चालू करून , https//web.whatsapp.com. हि वेबसाईट ओपन करा
४) वेबसाईट वर आलेला QR कोड मोबाईलच्या कॅमेराने स्कॅन करा त्यानंतर तुम्ही डेस्कटॉपवर व्हॉटस्अ‍ॅपला लॉगीन व्हाल. 

लेखक : प्रा य़ोगेश हांडगे 
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)

No comments:

Post a Comment